भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक माहिती सन-२०२६
| अ.क्र. | निवडणुकीचा टप्पा | टप्पा सुरु अथवा पूर्ण करण्याचा दिनांक |
|---|---|---|
| — | मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक | दि. ०१ जुलै, २०२५ (मंगळवार) |
| १ | आयुक्त, महानगरपालिका यांनी निवडणूक कार्यक्रमाची सूचना शासन राजपत्र व किमान दोन स्थानिक वृत्तपत्रात प्रसिध्द करण्याची तारीख | दि. १८ डिसेंबर, २०२५ (गुरुवार) |
| २ | नामनिर्देशनपत्र देण्याचा कालावधी | दि. २३ डिसेंबर, २०२५ (मंगळवार) ते दि. २९ डिसेंबर, २०२५ (सोमवार) (सकाळी ११ ते दुपारी ३) तसेच दि. ३० डिसेंबर, २०२५ (मंगळवार) (सकाळी ११ ते दुपारी २); गुरु. २५ व रवी. २८ डिसेंबर २०२५ रोजी नामनिर्देशनपत्रे देण्यात येणार नाहीत |
| ३ | वरील नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याचा कालावधी | दि. २३ डिसेंबर, २०२५ (मंगळवार) ते दि. ३० डिसेंबर, २०२५ (मंगळवार) (सकाळी ११ ते दुपारी ३); गुरु. २५ व रवी. २८ डिसेंबर २०२५ रोजी नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात येणार नाहीत |
| ४ | नामनिर्देशनपत्रांची छाननी | दि. ३१ डिसेंबर, २०२५ (बुधवार) (सकाळी ११.०० वाजल्यापासून) |
| ५ | वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे | छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच |
| ६ | उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक | दि. ०२ जानेवारी, २०२६ (शुक्रवार) (सकाळी ११ ते दुपारी ३) |
| ७ | निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक | दि. ०३ जानेवारी, २०२६ (शनिवार) (सकाळी ११.०० वाजल्यापासून) |
| ८ | अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे | दि. ०३ जानेवारी, २०२६ (शनिवार) |
| ९ | आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक | दि. १५ जानेवारी, २०२६ (गुरुवार) (सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३०) |
| १० | मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक | दि. १६ जानेवारी, २०२६ (शुक्रवार) (सकाळी १०.०० वाजल्यापासून) |
| ११ | शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करणे | दि. १९ जानेवारी, २०२६ (सोमवार) पर्यंत |
निवडणूक प्रक्रिया
प्रचार नियम
सभांपासून डिजिटल प्रचारापर्यंत सर्व कार्यक्रमांसाठी आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी.
निवडणूक आयोगाच्या सूचना
- आचारसंहिता उल्लंघनांसाठी समर्पित हेल्पलाइन.
- मतदानापूर्वी ४८ तास प्रचार सामग्रीवर बंदी.
- प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग अनुकूल सुविधा अनिवार्य.
- भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका निवडणूक अॅपद्वारे तक्रारींचे त्वरित निवारण.